चंद्रपूर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण

चंद्रपूर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा ६२ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. मनपा प्रशासक तथा आयुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याला उपायुक्त अशोक गराटे, मुख्य लेखाधिकारी संतोष कंदेवार, नगरसचिव कवडू नेहारे, सहाय्यक आयुक्त सचिन माकोडे, सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.