ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही -पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची ग्वाही

ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही -पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची ग्वाही

भंडारा, दि. 1 मे : स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या मार्फत ग्रामीण भागातील विकास योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासक प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज केले.

आज “हीरक महोत्सव समारंभ” जि. प. भंडाराचे सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या स्थापनेस 60 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने “हीरक महोत्सव समारंभ” कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. कदम यांनी केले. यावेळी लाल बहादुर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थीनीने सांस्कृतिक गित व नृत्य सादर केले.

            या कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, माजी पदाधिकारी तसेच जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. मुन, अति. मु. का. अ. दिपक चौधरी, उप मु.का.अ.(सा) डॉ. सचिन पानझाडे उप मु.का.अ.(पंचा) किरण कोवे तसेच इतर अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.