रब्बी हंगामातील धान तसेच भरडधान्य खरेदीकरिता पोर्टलद्वारे नोंदणी करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत

रब्बी हंगामातील धान तसेच भरडधान्य खरेदीकरिता

पोर्टलद्वारे नोंदणी करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत

        भंडारा, दि. 12 : पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि. 11 ते दि. 30 एप्रिल 2022 या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

          राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि. 01 मे, ते दि. 30 जून, 2022 असा कालावधी  ठेवण्यात आला आहे. तसेच भरडधान्य खरेदीकरिता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत. पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मध्ये धान तसेच भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांची NeML पोर्टलद्वारे दि. 11 ते दि. 30 एप्रिल 2022  या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करण्याबाबत सर्व स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागामार्फत  देण्यात आली आहे.