ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त…..

ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त…..

ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त रूग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना समोउपदेशन व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व सुचना करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही चे वैद्यकीय अधिकारी डॉ झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना आरोग्य विषयक समोपदेशन करण्यात आले. पंतप्रधान कौशल्य विकास योजना व मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना चे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी यांना डॉ रचना भालतडक, डॉ सुनिता लाकडे यांनी मार्गदर्शन केलेत. मार्गदर्शनात त्यांनी शारिरीक , मानसिक, सामाजिक दृष्टीने कसं सज्ज राहुन तत्परतेने रूग्णांना सेवा द्यायची हे मुख्यतः सांगण्यात आले.