जागतिक कर्णबधिरता सप्ताहानिमीत्त मोफत श्रवण तपासणी, उपचार व श्रवण यंत्र वाटप शिबिराचे

जागतिक कर्णबधिरता सप्ताहानिमीत्त मोफत श्रवण तपासणी, उपचार व श्रवण यंत्र वाटप शिबिराचे

 

भंडारा दि. 2: 1 ते 8 मार्च दरम्यान जागतिक कर्णबधिरता सप्ताहानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये कार्यशाळा, विविध स्पर्धा व 8 मार्च रोजी कार्यक्रमाची सांगता निमित्त “मोफत श्रवण तपासणी, उपचार व श्रवण यंत्र वाटप शिबिराचे” आयोजन कान, नाक, घसा विभाग ओपीडी 42, जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे करण्यात आले आहे.

उद्या दि. 3 मार्च रोजी जागतिक कर्णबधिरता दिनानिमित्त सामान्य रूग्णालयामार्फत विविध उपकृम राबविण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रूग्णालया अंतर्गत 3 मार्च 2023 हा दिवस “जागतिक कर्णबधिरता दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे.

शिबिरामध्ये ज्यांना ऐकु येत नसेल, बालकांना बोलता येत नसेल, कान फुटत असेल, सतत मोठ्या आवाजात संपर्क येत असेल अशा समस्यांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांनी व बालकांनी मोफत शिबिरामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांनी केले आहे.