भंडारा जिल्हाभरात सामुहिक राष्ट्रगीताचे गायन…. पूरग्रस्तांनी निवारागृहात केले सामुहिक गायन…. देशप्रेमाच्या चैतन्याने वातावरण बहरून गेले….!!

भंडारा जिल्हाभरात सामुहिक राष्ट्रगीताचे गायन….

पूरग्रस्तांनी निवारागृहात केले सामुहिक गायन….

देशप्रेमाच्या चैतन्याने वातावरण बहरून गेले….!!

भंडारा, दि.17 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात अत्यंत उत्साहात 8 ऑगस्ट पासून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. त्याच कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हयात महाविदयालय, बस आगार, जिल्हाधिकारी कार्यालय, व नागरिकांनी एकत्र येत सामुहिक राष्ट्रगीत गायन केले. सकाळी 11 वाजता केलेल्या या गायनामुळे पूराने विस्कळीत असूनही देशप्रेमाच्या चैतन्याने वातावरण बहरून गेले….!!.

जिल्हाधिकारी कार्यालय,सहाय्यक आयुक्त कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात सामुहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. गांधी चौक येथे नगरपालिका भंडाराच्या वतीने नागरिकांनी या सामुहिक गायनात सहभाग घेतला. एवढेच् नव्हे तर पूरग्रस्तांनीही निवारागृहात या गायनात सहभाग घेतला. तुमसर बस आगारात परिवहन महामंडळाचे कर्मचारी-अधिकारी, प्रवासी, चालक-वाहक यांनी सामुहिक गायन केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रगीत गायन संपन्न झाले. त्या प्रसंगी कार्यालयातील भोजराज चौधरी क्रीडा मार्गदर्शक, वरीष्ठ लिपीक रविंद्र वाळके, शिपाई रामभाऊ धुडसे, सुरक्षा रक्षक रवि चांदेवार, कांबळे, मैदान सेवक अतुल गजभिये , खेळाडू उपस्थित होते.

जिल्ह्यात अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा मोहिम राबविली त्यात आपण आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावलेले होते. ते ध्वज काढल्यानंतर त्या ध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. तसेच राष्ट्रध्वज आपल्या घरी सन्मानाने आणि सुरक्षित ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे