किन्ही, परसटोला व पिंडकेपार येथे शासकीय योजनांचा जागर

किन्ही, परसटोला व पिंडकेपार येथे शासकीय योजनांचा जागर

          भंडारा, दि. 10 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा यांचे मार्फत शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जयहिंद कलापथक संच, रामसागर ग्रामीण विकास बहु. संस्था सोनेगाव/भंडारा च्या वतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती साकोली तालुक्यातील किन्ही, परसटोला व पिंडकेपार येथील नागरिकांपर्यत पोहोचविण्यात येत आहे.

मनोजभाऊ कोटांगले, भावेश कोटांगले यांच्यासह या संचामध्ये उपस्थित सोनू मेश्राम, यशवंत बागडे, बालू भुजाडे, संदीप कोटांगले, सोनू लाडे, अरविंद शिवणकर, अर्चना कान्हेकर, संगीता बागडे होते. तसेच किन्ही, परसटोला व पिंडकेपार येथे ग्रा.प.चे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. जि.प. सदस्य सौ. दिपलता नंदकुमार समरीत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रम यशस्वीतेसाठी गट विकास अधिकारी प. स. साकोली उमेश नंदागवळी, जिल्हा माहिती अधिकारी भंडारा, संस्था सचिव दिलीप बिसेन यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे कार्यक्रम यशस्वितेकरीता ग्रा.प चे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.