अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर बाधंकामाकरीता अर्ज आमंत्रित Ø 10 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना

नवीन विहीर बाधंकामाकरीता अर्ज आमंत्रित

Ø 10 मार्चपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 8 मार्च : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर अंतर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेमध्ये वनहक्क कायद्यांतर्गत शेतजमीन मिळालेल्‍या अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नवीन विहीर खोदून बांधकाम करण्याकरीता दि. 10 मार्च 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

तरी, पात्र इच्छुक अर्जदारांनी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावा. विहित कालावधीमध्ये अर्ज सादर न केल्यास त्याचा विचार केल्या जाणार नाही. आवेदन अर्ज कार्यालयात उपलब्ध असून कोणत्याही बाहेरील व्यक्तीकडून अर्ज घेऊ नये, तसेच अर्जाची झेरॉक्स प्रत चालणार नाही, असे अर्ज रद्द करण्यात येतील व यासाठी हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. यापूर्वी अर्ज केलेल्या अर्जदारांनी नवीन अर्ज सादर करावे.

अधीकच्या माहितीसाठी चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन चिमूर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.