chandrapur I वयोवृद्ध,विधवा, निराधार, निराश्रीत महिलांना प्राधान्याने आवास योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे – युनुसभाई शेख

वयोवृद्ध,विधवा, निराधार, निराश्रीत महिलांना प्राधान्याने आवास योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे – युनुसभाई शेख

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नगराध्यक्ष न.प. सिंदेवाहि याना अर्जात्मक निवेदनाद्वारे केली मागणी.

दिनांक ०८/०३/२०२१ रोज सोमवारला ” जागतिक महिला दिनाचे ” औचित्य साधत नगरपंचायत सिंदेवाहि क्षेत्रातील विधवा, निराधार, निराश्रीत वयोवृद्ध महिलांच्या संवेदना जानून घेत त्वरित त्यांचे कार्यालयीन कागदपत्रे तैयार करुण या सर्व गरजुना हक्काचा निवारा मिळावा म्हणून युनुसभाई शेख सामाजिक कार्यकर्ता तथा नगरसेवक न.प. सिंदेवाहि यांचा पाठपुरावा सातत्याने सुरु होता.
अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले.
महिला दिनाचे औचित्य साधत तसेच वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव पाहता सिंदेवाहि शहरातील या वयोवृद्ध समुहातील निराधार, निराश्रीत विधवा श्रीमती हिरकनाबाई हसमुख खोब्रागडे राहणार सिंदेवाहि यांचा घरकुलाचा निवेदनात्मक अर्ज आशाताई विजय गंडाटे नगराध्यक्ष न.प. सिंदेवाहि यांचे स्वाधीन केले.
प्रवर्गातिल सदस्याना त्वरित लाभार्थी म्हणून कसे पात्र ठरविता येईल यावर सुद्धा विशेष सुचना केलेत.
सर्व वयोवृद्ध विधवा, निराधार, निराश्रीत महिलांना लवकरात-लवकर आवास योजनेचा लाभ देण्याची तळमळ दाखवावी अशी विशेष मागणी सुद्धा केली.
या प्रसंगी नंदाताई यादव बोरकर सभापती महिला व बालकल्याण न.प. सिंदेवाहि, युनुसभाई हबीब शेख अध्यक्ष जैवविविधता विभाग न. प. सिंदेवाहि इत्यादि उपस्थित होते.