chandrapur I नगरपंचायत सिंदेवाही कार्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा

नगरपंचायत सिंदेवाही कार्यालय येथे जागतिक महिला दिन साजरा

सिंदेवाही :- सिंदेवाही नगरपंचायत वतीने नगरपंचायत कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रम कार्यक्रमाचे अध्यक्ष आशा विजय गंडाटे, नगराध्यक्ष नगरपंचायत सिंदेवाही  तसेच प्रमुख मार्गदर्शक ॲड. प्रतिभा मोहूर्ले-घाटे, अध्यक्ष स्त्री शक्ती संघटना, सिंदेवाही, डॉ. पद्मजा वरभे,  युनुस शेख, अध्यक्ष जैवविधिता व संवर्धन समिती तथा नगरसेवक सिंदेवाही तसेच प्रमुख अतिथी म्हणून  नंदा यादव बोरकर, सभापती, महिला व बालकल्याण समिती, पुक्ष्पा वामनराव मडावी, नगरसेविका, प्रणाली अशोक जिवणे, नगरसेविका यांचे प्रमुख उपस्थित होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन व पुष्प अर्पण करुन करण्यात आली.

जागतिक महिला दिनांनिमित्त कार्यक्रमामध्ये महिलांनी गीत गायन, नकल करण्यात आले. आशा गंडाटे यांनी अध्यक्षणीय भाषण व प्रमुख मार्गदर्शक ॲड. प्रतिभा मोहूर्ले-घाटे, अध्यक्ष स्त्री शक्ती संघटना, सिंदेवाही, डॉ. पद्मजा वरभे,  युनुस शेख, अध्यक्ष जैवविधिता व संवर्धन समिती तथा नगरसेवक सिंदेवाही महिला सक्षमिकरण विषयावर उपस्थित महिलांना विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. कामर्यक्रमाला सिंदेवाही शहरातील बहूसंख्य महिला व अंगणवाडी कार्यकत्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  कमल बारसागडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शोभा मेश्राम तर आभार प्रदर्शन प्रणाली जिवणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायत येथील, गिता नागापूरे, दिपलता पातोडे, नंदा रगडे, संगििता कंबलवार व नगरपंचायत येथील कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.