chandrapur I महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ

महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ

उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प. स. सिंदेवाही अंतर्गत पंचायत समिती सभागृहात दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या पर्वावर “महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा” शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष मंदाताई बाळबुद्धे, सभापती प. स.सिंदेवाही कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शिलाताई कन्नाके , उपसभापती प. स. सिंदेवाही , पंचायत समिती सदस्य प्रीतीताई गुरनुले, नलिनीताई चौधरी,राहुल पोरेड्डीवार, रणधीर दुपारे पंचायत समिती सदस्य सर्व, सहाय्यक गटविकास अधिकारी घाटोळे साहेब , नीलिमा कोवले भरारी प्रभाग संघ अध्यक्ष वासेरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक तर संचालन ज्ञानेश्वर मल्लेवार प्रभाग समन्वयक व आभार प्रदर्शन सविता उईके प्रभाग समन्वयक यांनी केले. प्रतिभा थेरकर, सुनीता चौधरी, भारती वाघमारे या महिलांनी मनोगत व्यक्त केले यात स्वतः करीत असलेल्या कामाविषयी माहिती दिली, यावेळी १० समूहांनी वेगवेगळे लोणचे, पापड, मसाले, वड्या, शेंगदाणे पापडी, लाडू, नैसर्गिक गुलाल, फिनाईल,पंचगव्य साबण, हळद पावडर, इत्यादीं साहित्याचे प्रदर्शनी स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वते करिता उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक राहुल बोपचे तालुका व्यवस्थापक, संदीप उईके प्रभाग समन्वयक, मनोज दुपारे ऍडमिन अकाउंटंट, प्रफुल मडावी, सचिन लोंधे, मयूर खोब्रागडे यांनी व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सिंदेवाही सर्व कर्मचारी व ICRP, CTC, प्रभाग संघ पदाधिकारी यांचे उपस्थितीत करण्यात आला.