नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी 8 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी 8 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

 

भंडारा दि. 31: जवाहर नवोदयविद्यालयामध्ये इयत्ता 6 च्या प्रवेशासाठी शैक्षणिक सत्र 2023-24 करिता निवड चाचणीद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधी 31 जानेवारी पर्यंत ही मुदत होती. ती आता वाढवून आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी https://navodaya.gov.in किंवा https://cbseitms.rcil.gov.in/nvs या वेबसाईडवर विनामूल्य अर्ज करू शकतात.