सिंदेवाही तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उदघाटन

सिंदेवाही तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उदघाटन
जुना बस स्थानक सिंदेवाही येथील डॉ केशव शेंडे कॉम्प्लेक्स येथे सिंदेवाही तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयाचे उदघाटन संत गजानन महाराज शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ केशव शेंडे यांचे हस्ते पार पडले आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिंदेवाही पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक योगेश घारे हे उपस्थित होते. तसेच प्रमुख मान्यवर मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक बाबुरावजी परसावार, दिलीप लोडेल्लीवार स्वसेवा फाऊंडेशन नागपूर चे चेतन बांगडे श्रीकृष्ण इन्स्टिट्यूट चे संचालक तुळशीदास तुम्मे हे उपस्थित होते.
डॉ. केशव शेंडे यांनी कार्यालया करिता साहित्य आणि रूम उपलब्ध करून देऊन सर्वतोपरी मदत करण्याचे विश्वास दिले. तसेच पोलिस निरीक्षक घारे यांनी देखील कार्यालयात काही स्पर्धा परीक्षेचे पुस्तके उपलब्ध करून देणार असून काही होतकरू विध्यार्थी या ठिकाणी बसून अभ्यास करू शकतील असे सांगितले. संघाचे मार्गदर्शक लोडेल्लीवार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. संचालन जितेंद्र बेलोरकर यांनी केले. तर आभार संघाचे अध्यक्ष राकेश बोरकुंडवार यानी मानले याप्रसंगी संघाचे सुधाकर गजभिये, अनिल एलकेवार, शरद नैताम, भारत मेश्राम, राकेश निकुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.