जिल्हाधिकारी यांनी जवाहर नवोदय विद्यालय चाचणी परीक्षा 2023 च्या संदर्भात घेतली आढावा बैठक

जिल्हाधिकारी यांनी जवाहर नवोदय विद्यालय चाचणी परीक्षा 2023 च्या संदर्भात घेतली आढावा बैठक

 

भंडारा दि 9: आज दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा – 2023 च्या संदर्भात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बैठक घेतली.

 

या बैठकीला जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक एस. व्ही. डोरलीकर, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, पवनी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी एस. वाय. शर्मा, जवाहर नवोदय विद्यालय पाचगावचे प्राचार्य एम एस बलवीर, जिल्हा परीक्षा विभाग प्रमुख एच एम गायकवाड, फॅकल्टी कम सिस्टीम ऑपरेटर रुबीना शेख व शुभांगी घाटे आदी बैठकीला उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील इयत्ता पाचवीत शिकत असलेला एकही विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा -2023 पासून वंचित राहणार नाही याची शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी व तशा सूचना माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिल्या.

तसेच गरीब होतकरू मुले या सुवर्णसंधी पासून वंचित राहू नये म्हणून ग्रामीण भागातील मुख्याध्यापक व प्राचार्य यांनी दक्षता घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2023 चे प्रवेश फॉर्म भरावेत. फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी जातीने लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात.