स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त सायकल रॅलीचे आयोजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त सायकल रॅलीचे आयोजन

भंडारा दि. 8 : पोलीस प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली सकाळी 7 वाजता माधव नगर खात रोड येथून सुरूवात होणार असून त्याअनुषंगाने खेळाडूंची, नागरीकांची उपस्थिती सकाळी 5.30 वाजता रहावे. ही रॅली खुर्शीपार पर्यंत 5 कि.मी. जाणे व 5 कि.मी. परत येणे असे एकुण 10 कि.मी.ची असून स्पर्धेचा समारोप माधव नगर खात रोड येथे होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी सायकल रॅलीमध्ये सहभागात आपली नावे 9 ऑगस्ट 2022 पर्यंत मंगेश गुडधे (8999705415) क्रीडा मार्गदर्शक, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडे 3 वाजेपर्यंत नोंदवावे. या मॅराथॉन स्पर्धेमध्ये वर्ष 17 ते 45 वयोगटातील मुले व मुली यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.