प्रत्येक कार्यकर्ता पोहोचवेल भाजपाचा विचार सर्वदूर…

प्रत्येक कार्यकर्ता पोहोचवेल भाजपाचा विचार सर्वदूर

मूल तालुक्यातील सोमनाथ येथे आयोजित बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला ठाम विश्वास

चंद्रपूर, ता. २३ : भाजपाचा कार्यकर्ता एकमेकांना प्रोत्साहन देणारा आहे. भाजपाचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य तो निश्चितपणे करेल, असा ठाम विश्वास राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सोमनाथ ( मुल )येथे मोदी @9 जनसंपर्क अभियानाअंतर्गत आयोजित ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, टिफिन बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,भाजपा महामंत्री नामदेव डाहुले,नंदू रणदिवे,चंदू मारगोनवार,सुरेश ठीकरे,आनंदपाटील ठीकरे,अजय गोगुलवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा नावाने छोटेसे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे. भाजपाचा वटवृक्ष करण्यामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आणि आता त्याच पक्षाच्या माध्यमातून देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आता सेवा, सुशासन, प्रगती आणि गरीबांचे कल्याण करीत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला मोठे करण्यासाठी आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण वेचले. त्याच पक्षाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला मोठे करण्याचे काम अहोरात्र करीत आहेत.

भाजपाची ओळख नेहमीच कार्यकर्त्यांमुळे कायम राहिली आहे. ईतर पक्षांसाठी त्यांचा परिवार हे सर्वस्व आहे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राष्ट्र हे त्याचा परिवार आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या भविष्याचा वेध घेत विचारमंथन करावे यासाठी आजचे संमेलन अर्थात टिफिन बैठक महत्वाची असल्याचे नमूद करीत ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की,  देशात विषारी विचार पेरण्याचे काम सुरू आहे. असे विषारी विचार पेरणाऱ्या पक्षांना डबाबंद करण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले.

भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकमेकाच्या एकजूटीतून हा संकल्प सामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचावा. विकासाची मोठी जबाबदारी आपण सर्व पेलत आहोत. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक अशा सर्वच बाजुने आपला मतदार संघ कसा विकास करेल यावर जोर द्यायचा आहे, असे मत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आपल्या मतदार संघाने नेहमीच विविध सकारात्मक कामांच्या बाबतीत व मतदारसंघात विकासाला सर्वोच्च स्थान कायम ठेवण्याचा आपला कायम  प्रयत्न आहे. बल्लारपूर येथील काष्ठ आज अयोध्येच्या श्रीराम मंदिराची शोभा वाढवत आहे. संसदेच्या सेंट्रल व्हिस्टामध्येही चंद्रपुरातील लाकुड वापरण्यात आले आहे. असे वैशिष्ट्य असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याची शान सतत वाढत राहो, असे प्रतिपादन ना. श्री. मुनगंटीवार यांनी टिफिन बैठकीत केले.

कार्यकर्त्यांसह स्नेहभोजन !

या टिफिन बैठकीत देशगौरव नरेंद्रजी मोदी यांच्या नऊ वर्षाच्या विकास कामाची उपस्थितांना माहिती देत, मनमुरादपणे गप्पा मारत ना. श्री. मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांसह स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.