भेसळयुक्त साठ लिटर दुध, दुग्ध तपासणी पथकाने केले नष्ट

भेसळयुक्त साठ लिटर दुध, दुग्ध तपासणी पथकाने केले नष्ट

            भंडारा, दि.31 :दुध भेसळ तपासणी पथकाने  भंडारा व  लाखनी येथील दुध केंद्राची तपासणी केली.त्यात त्यांना राहुल डेअरी,गडेगाव,ता.भंडारा येथील वास येणाऱ्या दुधाची दोन कॅन दुध नष्ट करण्यात आले.कमी प्रतीचे (भेसळ) दुध तपासणी पथकाने काल  भंडारा तालुक्यातील गडेगाव येथे पोहचले . राहुल डेअरी,गडेगाव येथे एकूण 720 लिटर दुधाची तपासणी करण्यात आली.तपासणीमध्ये 60 लिटर दुध अनैसर्गिक वास व चव असल्यामुळे जागेवर नष्ट करण्यात आले.

           पथकात जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ.मीना चिमोटे ,जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी व त्यांची प्रतिनिधी श्री.पात्रे व दुध संघाचे केमिस्ट श्री.रोहणकर सहभागी झाले होते.जिल्ह्यातील सर्व  खाजगी व सहकारी दुध उत्पादक संस्था व प्रक्रिया प्रकल्प या सर्वांची तपासणी होणार असून नैसर्गिक दुधात भेसळ आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे  दुग्ध तपासणी पथकाने कळविले आहे.