माजी सैनिक,माजी सैनिक विधवा, यांचा मेळावा 

    माजी सैनिक,माजी सैनिक विधवा, यांचा मेळावा 

    भंडारा,दि.30 : भंडारा/गोंदिया जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक,माजी सैनिक विधवा, वीर् नारी व अवलंबित यांना सुचित करण्यात येते की,गार्ड रेजिमेंटल सेंटर कामठी व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,भंडारा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय सैनिक मेळावा उद्या 31 जानेवारी,रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे,भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे.

    या सैनिक मेळाव्यामध्ये पेंशनबाबत निराकरण,डिजिटल लॉईफ सर्टीफिकेट आणि स्पर्श प्रणालीबाबतची माहिती देण्यात येणार आहे.तरी भंडारा/गोंदिया जिल्ह्यातील माजी सैनिक,विधवा,विरनारी व त्यांचे अवलंबित यांनी या कार्यक्रमाचा जास्ती जास्त लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,श्री आकाश अवतारे यांनी कळविले आहे.