कन्यादान योजनेकरीता स्वयंसेवी संस्थेकडून प्रस्ताव आमंत्रीत / सामुहीक विविह सोहळ्याचे आयोजन

कन्यादान योजनेकरीता स्वयंसेवी संस्थेकडून प्रस्ताव आमंत्रीत / सामुहीक विविह सोहळ्याचे आयोजन

 

भंडारा, दि. 21 : आदिवासी विकास विभागाकडून सामुहीक विविह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर होणारा खर्च कमी करण्यासाठी आणि विवाह सोहळ्यातील अनुचित प्रथांना आळा घालण्यासाठी सन 2003-4 पासून कन्यादान योजना सुरू केलेली आहे.

सन 2011 च्या जनगणने नुसार जिल्हयामध्ये आदिवासी जमातीची लोकसंख्या 88 हजार 886 असून त्यामध्ये विविध जमातीचा समावेश आहे. सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधू आणि वर दाम्पत्यांना आर्थिक सहभाग 10 हजार रूपये देण्याची कन्यादान योजना राबविण्यात येत आहे.

ही योजना राबविण्या करिता नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी इच्छूक स्वयंसेवी संस्थांनी 20 जानेवारी 2023 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे. अधिक माहिती करिता 07184-251233 प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.