निवृत्तीवेतन धारकांना सूचना….

निवृत्तीवेतन धारकांना सूचना

भंडारा, दि. 29 : जून 2022 चे निवृत्तीवेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देण्यात येणार असल्याने निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जून 2022 चे निवृत्तीवेतन एक आठवडा विलंबाने होणार आहे, असे प्रभारी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पत्की यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.