डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाच्या औचित्याने आरोग्य शिबिर

बोधिसत्व,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व महात्मा फुले स्मृतिदिनाच्या औचित्याने मौजा कन्हाळगाव ता. नागभीड़ येथे मोफत रोगनिदान व औषधोपचार शिबिर घेण्यात आले .

सिद्धांत हॉस्पिटल नवरगाव चे डॉ दाम्पत्य, डॉ दीपक खोब्रागडे व डॉ. रोहिणी खोब्रागडे ह्यांनी शिबिराचे आयोजन केले होते .

शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघडीचे चिमूर तालुका अध्यक्ष प्रा.डॉ. बाळासाहेब बंसोड ह्यांचे हस्ते करण्यात आले . अध्यक्षस्थानी कन्हाळगावाचे सरपंच मा.रमेश घुगुस्कार व प्रमुख पाहुने म्हणून अशोक बोरकर,रमाबाई महिला मंडळ सचिव आयु.यशोधरा बारसागड़े,संघटिका गीता खोब्रागडे होते .संचालन शैलेन्द्र बारसागड़े वंचित बहुजन आघाडी चंद्रपुर जिल्हा महासचिव ह्यांनी केले.शिबिरात 376 लहान मुले ,स्त्री पुरुष, रुग्णाची तपासणी करून मोफत औषधोपचार डॉ खोब्रागडे दांपत्याद्वारे करण्यात आला.

शिबिर यशस्वी करण्याकरिता बौद्ध समाज कान्हाळगाव चे पदाधिकारी तथा सिद्धांत हॉस्पिटल नवरगावचे फार्मासिस्ट वीरेंद्र पिल्लेवान,विद्या पिल्लैवान, संतोषी चहांदे,मोनिका मांदाले, सुजल खानोरकर ह्यांनी परिश्रम घेतले.