chandrapur I अवैध दारू विक्रेत्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून पोलीसांच्या वाहनावर केली दगडफेक

अवैध दारू विक्रेत्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून पोलीसांच्या वाहनावर केली दगडफेक

“दारू विक्रेत्यांनी आमच्या पोलिसावर हल्ला केला आहे. त्यानंतर अटकेसाठी जात असताना पोलिस वाहनावर दगडफेकही केला आहे. लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केल्या जाईल “- अनुज तारे, उपविभागीय पोलिस अधिकारी मुल

सावली तालुक्यातील किसाननगर येथे अवैध दारू सापडल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दारू विक्रेत्यांकडून पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. किसाननगर मधे दारू विक्रेत्यांचे जोरदार व्यवसाय सुरू आहे. या संदर्भात अनेकदा सावली पोलिसांनी दारू भट्टी उध्वस्त करून दारू अनेक दारू विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे.

किसननगर वरून तालुक्यातील इतरही गावातील दारूचा पुरवठा केला जातो अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळताच काल दिनांक २१ ला सायंकाळी सातच्या सुमारास एका दुचाकी वाहनाची तपासणी केली असता अवैध दारू मिळाली.आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना अवैध दारू विक्रेत्याकडुन धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली.
या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास पोलीस गाडी आनंदनगर मध्ये पोहोचताच त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.
आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू