रामनगर पोलीसांनी कुख्यात आरोपीकडुन चोरीच्या ०५ मोटार सायकल केल्या जप्त
दिनांक २६/१०/२०२५ रोजी फिर्यादी नामे चंद्रहास अर्जुन मुन वय ४७ वर्ष धंदा खाजगी नौकरी रा. शामनगर जे.पी. इंग्लीश स्कुल चंद्रपुर. हे काही कामा निमीत्य जात असतांना त्यांचे ताब्यातील मो.सा. गाडी हिरो होंडा कंपनीची सि.डी. डिलक्स गाडी क्र. एम.एच. ३४ डब्ल्यु ६७२४ हया गाडीने बंगाली कॅम्प येथील डि.आर.सी. हेल्य क्लब जवळील पानठेल्याजवळ हॅन्डल लॉक करून ठेवले व आपले काम करून परत त्या ठिकाणी गेले असता त्यांना त्यांची मो.सा. गाडी दिसुन आली नाही. कोणी तरी अज्ञात चोराणी सदर मो. सा. गाडी चोरी करून नेली अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे गांभीर्य बघुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मा. आशिफ राजा शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे नेतृत्वात चोरी करणारे ईसम यांचा सि.सि.टि.व्ही. फुटेज चेक करून तसेच गोपनीय यत्रना लावुन सदर आरोपीचा शोध घेत असतांना गोपनीय माहिती मिळली की, यातील आरोपी नामे १) नाव :-गोपाल जिवन मालाकार वय ३० वर्ष धंदा मजुरी रा. शामनगर बंगाली कॅम्प चंद्रपुर., २) नाव:- आशिष उर्फ जल्लाद अक्रम शेख वय २२ वर्ष धंदा मजुरी रा. फुटक नगर एकता नगर चंद्रपुर. यांनी जिल्हा चंद्रपुर तसेच जिल्हा नागपुर येथे मोटर सायकल करून विक्री करीता चंद्रपुर येथे आणले आहे अशा महिती वरून नमुद ईसमास ताब्यात घेवुन त्यांचे कडुन १) सदर गुन्हयातील चोरीचे मोटार सायकल सह अन्य चोरीच्या मो.सा. मिळुन आले ते खालील प्रमाणे.
१) एक जुनी वापरती हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची सिल्व्हर व निळया रंगाचे पट्टे असलेली सि.डी. डिलक्स गाडी तिचा क्रमांक एम.एच. ३४ डब्ल्यु ६७२४ असलेला कि. अं. ५,०००/- रू
२) एक जुनी वापरती होंडा अॅक्टीव्हा ६ जी निळया रंगाची गाडी बिना नंबर प्लेट असलेली तिचा इंजन नंबर JF91ED0150466 व चेचीस क्रमांक ME4JF913CMD151528 असा असलेली कि.अं. ४०,०००/- रू
३) एक जुनी वापरती काळया रंगाची सुझुकी प्रवेश १२५ कंपनीची मोपेड गाडी पूर्ण नंबर एम.एच. ४९ ए. शिवाय. ८५९२ असलेली सदर गाडीचे सॅकप तुकडा (बिगा उतारा) असलेली कि.अं. ३५,०००/- रु
४) एक जुनी वापरती काळया ग्रे रंगाची लाल पट्टे असलेली हिरो कपनीची स्प्लेडंर प्लस गाडी (मो.सा) तिचा क्रमांक एम.एच. ४९ सि.एन. २३२० असा असुण तिचा चेचीस क्रमांक MBLHAW403RHL16990 असा असलेली कि.अं. ५०,०००/- रू
५) हिरो स्प्लेंडर प्लस काळया रंगाची मोटर सायकल तिचा क्रमांक एम.एच. ३४ बि.एल. ६२४२ असा असुन किमंत अंदाजे ३०,०००/- रू असा एकुण १,६०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कार्यवाही मा. श्री. मुम्मका सुदर्शन साहेब पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. श्री. ईश्वर कातकडे साहेब अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा.श्री. प्रमोद चौगुले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. आशिफ राजा शेख वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी स.पो. नी. देवाजी नरोटे, हनुमान उगले, निलेश वाघमारे, व कर्मचारी पो. हवा. आनंद खरात ब.नं. ११६५, जितेंद्र आकरे ब.नं. ५६६, शरद कुडे ब.नं. २२७३, लालु यादव ब.नं. २४३०, बाबा नैताम ब. नं. २२५३, गजानन नागरे ब.नं. १९१२, म.पो. हवा. मनिषा मोरे ब.नं. ४६२, पो.अं. रविकुमार ढेंगळे ब.नं. ८४७, पंकज ठोंबरे ब.नं. १२३०, प्रफुल पप्पुलवार ब.नं. ६३०, संदिप कामडी ब.नं. ८८१, सुरेश कोरवार ब.नं. २२९१, रूपेश घोरपडे ब.नं. २८७९, व म.पो.अं. ब्ल्युटी साखरे ब.नं. २६५३ यांनी केली आहे.








