चंद्रपूर जिल्हयातील विविधी पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण १७ दाखल गुन्हयातील ३१३किलो ९३६ ग्रॅम अंमली पदार्थ नाश करण्यात आले.
दि. 16/09/2025 ते दि.30/09/2025 पर्यंत शासनातर्फे अंमली पदार्थ नाश करणे करीता विशेषे मोहिम राबविण्यात आली असल्याने सदर मोहिमे दरम्यान चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हयातील जप्त अंमली पदार्थ नाश करण्या बाबत मा. न्यायालय, चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रण मंडळ यांची परवागी घेवून MAHARASHTRA ENVIRO POWER LIMITED (NAGPUR UNIT) CHW01, Mandwa, Butibori Industrial Estate, Butibori, Nagpur 441122 Maharashtra येथे चंद्रपूर जिल्हयातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 16 गुन्हयातील 305 किलो 886 ग्रॅम गांजा व 1 गुन्हयातील 8 किलो 50 ग्रॅम डोडा पावडर असे एकूण 17 गुन्हयातील अंमली पदार्थ नाश समितीव्दारे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन सा., चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पो.नि. अमोल काचारे, स.फौ. अरूण खारकर, पो.हवा. प्रमोद डंभारे, पो.हवा. सुधीर मत्ते, पो.हवा. दिपक डोंगरे पो.कॉ. प्रदिप मडावी, अमोल सावे, मिलींद टेकाम यांचे उपस्थीतीत पंचा समक्ष शासकीय नियमानुसार नमुद अंमली पदार्थ दि.30/09/2025 रोजी नाश करण्यात आला.