अवैधरित्या देशी-विदेशी दारु वाहतुक करणारे इसमाविरुध्द कारवाई, ४,२८,०००/- रु.चा माल जप्त
पोलीस स्टेशन गोंडपिपरी ची कारवाई
दिनांक २९/०९/२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी मुल श्री सत्यजित आमले यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH33-T-3376 मधुन बल्लारपूर येथील आष्टी कडे देशी विदेशी दारुची वाहतुक होत आहे. याववरुन गोंडपिपरी पोलीसांनी शिवाजी चौक गोंडपिपरी येथे पोलीस स्टॉफसह नाकाबंदी केली असता पिकअप वाहन क्रमांक MH33-T-3376 हे बल्लारपूर वरुन येत असतांना दिसल्याने त्यास थांबवून त्याची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर वाहनामध्ये देशी दारु संत्रा ९० एम.एल.च्या ४०० नग बाटल्या किंमत १६,०००/- रु. आणि रॉयल स्टॅग १८० एम.एल. च्या ४८ नग कि. १२,०००/- रु. असा अवैध रित्या वाहतुक करीत असल्याचे मिळूनआल्याने सदर देशी विदेशी दारु आणि वाहतुकीकरीता वापरलेला वरील नमुद वाहन किं.४,००,०००/- असा एकुण ४,२८,०००/- रुपयाचा माल जप्त करुन आरोपीविरुध्द कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांचे नेतृत्तवात सपोनि श्री रमेश हत्तीगोटे, पोअं अतुल तोडासे, पोअं. प्रविण कडुकर, गृहरक्षक गुडपल्ले, चिलनकर, बामणे सर्व पोस्टे गोंडपिपरी यांनी केली आहे.









