१७ नग लोखंडी चैनल चोरीचा गुन्हा उघडकीस

पोलीस स्टेशन पडोली येथील गुन्हे शोध पथकाद्वारे पोस्टे परीसरात १७ नग लोखंडी चैनल चोरीचा गुन्हा उघडकीस

दिनांक २३/०५/२०२५ रोजी फिर्यादी अभिलेप परमेश्वर चौधरी वय ४१ वर्ष रा. वार्ड क. ०६ घुग्घुरा यांनी पोलीस स्टेशन पडोली येथे येवुन तक्रार दिली की, एमआयडीसी परीसर ताडाळी कडे रोडचे काम सुरु होते तेथे ०६ मीटर लांबीचे ५८ नग लोखंडी चैनल ठेवले होते दि. २१/०९/२०२५ चे सकाळी १०:०० वा. जावुन पाहीले असता सदर ठिकाणावरुन १७ नग लोखंडी चैनल कि. १,८६,०००/- रु. किंमतीच्या माल दिसुन आला नाही. कोणीतरी अज्ञात चोरुन नेले यावरुन अप क्र. १४६/२०२५ कलम ३०३ (२) बी. एन. एस प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

तपासात, सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना दि. २६/०९/२०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन एमआयडीसी ताडाळी परीसरात जावुन लोहा विक्री बाबत चर्चा करणारे संशयितांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की दि. २१/०९/२०२५ रोजी रात्रो ११:०० वा. ते १२/०० वा. दरम्यान सर्व मित्र मिळुन नामे भारत देवी निषाद यांचे मालकाचे ट्रक क्र.एम एच-३४. वीजी-९३२३ ज्याची चावी याचेच कडे राहते तो ट्रक घेवुन भारत निषादने सांगितले प्रमाणे एमआयडीसी परीसर ताडाली येथे आलो व तेथे लोखंडी चॅनल पडलेले होते ते वजनी असल्याने भारत व आम्ही आजु बाजुला कोणी मिळते का ते पाहीले तेथे रात्रो दोन अनोळखी ईसम जात होते त्यांना रोजी देतो आमचे कंपनीचे काम आहे चॅनल गाडीत लोड करुन द्या असे म्हणुन त्या अनोळखी दोन इसमांना सोबत घेवुन तेथील १७ नग अंदाजे ०६ मीटर लांबीचे लोखंडी चॅनल चोरल्याची कबुली दिली. त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी १) भारत देवि निषाद वय २५ वर्ष, २) दगदिशकुमार उर्फ गुड्डु ग्यानप्रकाश निषाद वय २७ वर्ष, ३) सुनिल राकेश निपाद वय १९ वर्ष, ४) सुनिल अवधेश निषाद वय १८ वर्ष सर्व रा. हनुमान मंदीर मागे लखमापुर असे सांगितले. व त्यांचेकडुन १) कि. १,८६,०००/- रु. चे १७ नग लोखंडी चैनल व २) कि. १५,००,०००/- रु. चा वाहतुक करण्यास वापरलेला महिंद्रा कंपनीचा ब्लाजो १४ चक्का ट्रक एमएच-३४.बीजी-९३२३ क्रमांकाची असा एकुण १६,८६,०००/- रु. चा माल जप्त केला

सदरची कार्यवाही सहा. पोलीस निरीक्षक योगेश हिवसे यांचे नेतृत्वात गुन्हे अन्वेषन विभागाचे इंचार्ज पोहवा विनोद वानकर, पोअं प्रतिक हेमके, पोअं धिरज भोयर, पोअं कोमल मोहजे, मपोअं सुचीता उमरे यांनी केली आहे.