स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन
मंगेश बनसोड
ब्रम्हपुरी -केंद्र शासनाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत दि.19 सप्टेंबरला उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे रोगनिदान व उपचार या शिबिराचे आयोजन करण्यात आले .स्वस्थ नारी म्हणजे सशक्त कुटुंब आणि सक्षम समाज. या अभियानाचे उद्घाटन डॉ. नयना दुपारे सहा. संचालक हिवताप नागपुर, डॉ. भास्कर सोनारकर अति.जिल्हा शल्यचिकित्सक चंद्रपूर ,डॉ . शितल सोनारकर स्त्रीरोग तज्ञ चंद्रपूर ,डॉ. महादेव चिंचोले जि. शल्यचिकित्सक चंद्रपूर व डॉक्टर प्रीतम खंडाळे वैद्यकीय अधीक्षक ब्रह्मपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे संपन्न झाले. त्याचबरोबर भाजपा महिला सेलच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात एकूण 759 रुग्णांची तपासणी करण्यात आली यात 432 स्त्रिया व 327 पुरुष तपासणी करण्यात आली. अंतर्गत 156 स्त्रिया व 42 पुरुष असे एकूण 198 रुग्णांची रक्तदाब ,मधुमेह ,कर्करोग तपासणी करण्यात आली आणि 168 स्त्रियांची गर्भाशय कर्क तर 42 पुरुषांची मुख कर्क रोग तपासणी करण्यात आली .50 रुग्णांची क्षयरोग तपासणी करून एक्सरे करण्यात आले. 62 गरोदर महिलांची संपूर्ण तपासणी करण्यात आली. 46 रुग्णांची सोनोग्राफी करण्यात आली .79 रुग्ण डोळे तपासणी, 33 रुग्ण दंतरोग आणि 157 रुग्ण यांना आयुष्य अंतर्गत सेवा प्रदान करण्यात आली. पंचकर्म अंतर्गत 5 तर युनानी अंतर्गत 10 रुग्ण सेवा देण्यात आली यामध्ये 19 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी सेवा देण्याकरिता चंद्रपूर येथून जि. रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तज्ञ डॉक्टर व कर्मचारी तसेच ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालया अंतर्गत ज्या काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यातील डॉक्टर व कर्मचारी वर्ग या शिबिरात उपस्थित झाले होते. सदर शिबिरात आहार बद्दल जनजागृती आणि विविध आरोग्य कार्यक्रमा व उपक्रमाबाबत जनजागृती प्रदर्शनी लावण्यात आली होती. तसेच अवयव दाना बाबत नाविन्य पद्धतीने जनजागृती वर विशेष भर दिला गेला होता. सदर शिबिराचे आयोजन डॉक्टर महादेव चिंचोले जि. शल्य चिकित्सक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रीतम खंडाळे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी व त्यांच्या चमूने केले.