सेवा पंधरवडानिमत्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

सेवा पंधरवडानिमत्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम

चंद्रपूर, दि.१८ : शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये MHT-CET, NEET, JEE, MBA, B.ED, PHD, BSC AGRL B.PHARM, BSC NURSING इत्यादी CET देऊन व्यावसासिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे व तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला प्रवेशित असणारे ज्यांना अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा अर्जदारांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान विशेष मोहिमेअंतर्गत आपला जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करावा. तसेच लवकरात लवकर पडताळणी करून घ्यावी.

12 वी विज्ञान शाखेतील सत्र 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवगीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जेणेकरून समितीचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान होऊन विद्यार्थ्यांना विहित वेळेत जातवैधता प्रमाणपत्र मिळू शकेल. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी आपला रितसर, परिपूर्ण भरलेला अर्ज तात्काळ सादर करावा.

तसेच 17 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर (शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) दरम्यान त्रुटीपूर्तता शिबिराचे आयोजन केले आहे. ज्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीकरीता अर्ज दाखल केलेले आहे, परंतु अपुर्ण पुराव्याअभावी ज्यांची प्रकरणे त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी दिलेल्या दिनांकास किंवा त्यापुर्वी आपण सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती जाणुन त्रुटीपूर्तता करून घ्यावी. जेणेकरून सत्र 2025-26 मधील प्रवेश प्रक्रियेत जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणत्याच मागासवर्गीय विद्यार्थ्याला वंचित राहण्याची वेळ येणार नाही, असे समितीचे उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.