गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जहाल महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश
एक कमांडर आणि एक एसीएम दर्जाच्या वरीष्ठ महिला माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश
महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहिर केले होते एकूण १४ लाख रुपयांचे बक्षिस
घटनास्थळावरुन ०१ एके-४७ रायफल व ०१ पिस्तूल अशा ०२ अग्निशस्त्रांसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा व माओवादी साहित्य जप्त
एटापल्ली तालुक्यातील पोस्टे गट्टा (जां.) हद्दीतील मौजा मोडस्के जंगल परिसरात विध्वंसक कारवाया करुन घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली विभागातील गट्टा दलमचे काही माओवादी एकत्र येऊन दबा धरुन बसले आहेत, अशा गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरुन मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या पाच तुकड्या आज दिनांक १७/०९/२०२५ रोजी अहेरी येथून तातडीने सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान राबविणेकामी रवाना करण्यात आल्या होत्या. तसेच अभियानादरम्यान पोस्टे गट्टा (जां.) चे पोलीस पथक व सीआरपीएफ १९१ बटा. ई कंपनीच्या पथकाकडून जंगलाच्या बाहेरुन सदर जंगल परिसरात घेराबंदी करण्यात आलेली होती.
यावेळी मौजा मोडस्के जंगल परिसरात पोलीस पथके माओवादविरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्यावेळी पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेऊन शरण येणे बाबत आवाहन केले असता, माओवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०२ जहाल महिला माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. सदर दोन्ही मृतक महिला माओवाद्यांची ओळख पटेली आहे