शिक्षकाच्या निलंबनाची कारवाई करा अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन रस्तावर उतरेल…
दि . 11 / 09/ 2025 मौजा मांगली तालुका ब्रम्हपुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका चिडखोर शिक्षकाने ईयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांना स्कुल या शब्दाची स्पेलिंग न आल्याने तब्बल 9 ते 10 विद्यार्थ्यांना वळ येईपर्यंत बेदम अमानुष मारहाण केली. या प्रकरणी दोन सदस्यीय समिती गठीत केली गेली होती समितीने अहवालात अमानुष मारहाण झाल्याचे सांगितले वृत्तपत्रात तशी बातमी सुद्धा आली परंतु या घटनेला पंधरा ते विस दिवसांत त्या शिक्षकावर अजुन कोणतीही कारवाई झाली नाही. करीता भीम आर्मी भारत एकता मिशन तर्फे तालुका अध्यक्ष मा. प्रभुजी लोखंडे तथा महासचिव नागेश चहांदे यांनी शाळेत तसेच पीडित परिवारास प्रत्यक्षात भेट दिली होती. त्यानंतर दि.11/9/2025 ला भीम आर्मी तालुका ब्रम्हपुरी तर्फे उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय तसेच मा.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर , मा. गटविकास शिक्षणाअधिकारी प. समिती ब्रम्हपुरी . यांना निवेदन देऊन शिक्षकाच्या निलंबनाची मागणी करण्यात आली अन्यथा आंदोलनाचा ईशारा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रभु लोखंडे, सचिव अमित रामटेके , महासचिव नागेश चहांदे, सहसचिव नानाजी रुईकर,सदस्य मिलिंद लोखंडे,सदस्य धर्मेंद्र गाडगे आदी . उपस्थित होते.







