ऑनलाइन जुगार माफियांवर कठोर कारवाई करावी – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश 

ऑनलाइन जुगार माफियांवर कठोर कारवाई करावी – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश 

मुंबई, दि. १२ : राज्यात विविध ठिकाणी ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे समोर आले असून, या जुगार माफियांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ऑनलाइन जुगार माफियांविरोधात कारवाईसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस पोलीस उपायुक्त शर्मिला सहस्रबुद्धे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी तसेच तक्रारदार उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, ऑनलाइन जुगार थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे पुरावे जमा करून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करून तपास करावा.

नागरिकांनी अशा प्रकारच्या जुगारांमध्ये सहभाग घेऊ नये, असे आवाहन करताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. जे नागरिक या जाळ्यात अडकले आहेत त्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्याचेही निर्देश पोलिसांना दिले जाणार असल्याचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी सांगितले.