पडोली चौक येथे २९८ ग्रॅम बाऊनशुगर / हेरॉईन जप्त
दोन आरोपी अटक, ब्राऊनशुगर / हेरॉईन, कार, रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ३०,१९,५५०/- रु.चा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक ०६ सप्टेंबर, २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकास गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, छोटु गोवर्धन नामक इसम हा त्याची कार क्र.एम.एच. ३४-बीआर-७७६५ ने चंद्रपूर शहरात ब्राऊन शुगर (गर्द) ड्रग्ज पावडर विक्री करीता घेवुन येणार आहे. अशा खात्रीशिर माहितीवरुन नागपूर-चंद्रपूर रोडवरील पडोली चौक येथे सापळा रचुन चंद्रपूर कडे येत असलेली कार MH34-BR-7765 ला थांबवुन सदर वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता वाहनातील आरोपी नामे (१) नितीन उर्फ छोटु शंकर गोवर्धन वय ४२ वर्ष रा. महात्मा फुले वार्ड बाबुपेठ चंद्रपूर याचे ताब्यात २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर / हेरॉईन अवैधरित्या विक्री करीता नेत असल्याचे मिळुन आल्याने आरोपी नितीन उर्फ छोटु शंकर गोवर्धन व त्याचा साथीदार नामे (२) साहिल सतिश लांबदुरवार वय २३ वर्ष रा. भिवापूर वार्ड चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन एकुण २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर / हेरॉईन आणि गुन्हयात वापरलेले वाहन (कार) रोख रक्कम व मोबाईल असा एकुण ३०,१९,५५०/- (अक्षरी तीस लक्ष एकोणवीस हजार पाचशे पन्नास रु) चा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन पडोली येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम कारणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोस्टे पडोली सपोनि श्री योगेश हिवसे, स्थागुशा सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकर, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री सुनिल गौरकार, सफौ / धनराज करकाडे, स्वामी चालेकर, पोहवा/नितीन रायपुरे, संतोष येलपुलवार, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, गणेश भोयर, जयसिंग, सुरेद्र महंतो, सचिन गुरनुले, दिपक डोंगरे, विजयमाला वाघमारे, पोअं किशोर वाकाटे, शंशाक बादामवार, मिलींद जांभुळे, सुमित बरडे, अजित शेन्डे, प्रफुल्ल गारघाटे, चापोहवा प्रमोद डंभारे, मिलींद टेकाम आणि सायबर पोलीस स्टेशन, चंद्रपूर यांनी केली आहे.