गडचिरोली : शिवसेना भवन अस्मितेचा व आस्थेचा आहे, बोलतांना जीभ सांभाळून बोला – रियाजभाई शेख

शिवसेना भवन अस्मितेचा व आस्थेचा आहे, बोलतांना जीभ सांभाळून बोला – रियाजभाई शेख

आमदार प्रसाद लाडच्या वक्तव्यावर अहेरीत निषेध

सदाशिव माकडे
(गडचिरोली जिल्हा)

अहेरी :- भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य केल्याने शिवसेनेचे भावना उफाळून आले असून त्यांच्या वक्तव्याचे अहेरीत पडसाद पडले असून तीव्र शब्दात निषेध नोंदवून शिवसेनेचे अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर हल्ला चढविले.
शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी, आमदार प्रसाद लाड यांचे खरपूस समाचार घेतांना म्हणाले की, राज्यातच नव्हे तर देशात ‘शिवसेना भवन आस्थेचा व अस्मितेचा’ विषय असून, शिवसेना भवन फोडण्याचे तर दूरच, साधे हात लावले किंवा वाईट नजर टाकले तरी, तुमची काय अवस्था होईल हे वेळ आणि काळच सांगेल असे म्हणत यापुढे बोलतांना जीभ सांभाळून बोला अन्यथा आम्ही शिवसैनिक हे कदापि खपवून घेणार नसल्याचा इशाराही रियाज शेख यांनी यावेळी दिले.
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी जीभ घसरवीत असल्याने भावना दुखावत असून राग उफाळून आला तर वाईट परिणाम भोगावे लागतील त्यामुळे विरोधकांनी विरोध व टीका नक्कीच करावे पण बोलतांना नियंत्रण ठेऊन बोलावे असा सल्लाही रियाज शेख यांनी दिले.
निषेध नोंदवितांना उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, तालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, सुभाष घुटे, महिला आघाडीच्या पौर्णिमा इष्टाम, तुळजाताई तलांडे आदी शिवसैनिक होते.