70 विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह न करण्याची शपथ

चामोर्शी तालुक्यातील राममोहनपुर जिल्हा परिषद शाळेतील
70 विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह न करण्याची शपथ

जिल्हा बालविवाह मुक्त  करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग
व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती  मोहीम

गडचिरोली,दि.01: चामोर्शी तालुक्यातील राममोहनपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लग्ननाचे योग्य वय पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नसल्याची तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची सामुहिकरीत्या 70 विद्यार्थ्यांनी शपथ घेतली.

दिनाक 30 नोव्हेंबर 2023 रोज गुरुवार ला जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राममोहनपूर येथे शिकत असलेल्या 70 विद्यार्थ्यांना बालविवाह करणार नसल्याची शपथ देवून बालविवाहाचे दुष्यपरिनाम, तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये विवाह करणाऱ्या मुलांसाठी 21 वर्षे तर मुलींसाठी 18 वर्षे पूर्ण ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे याची बालकांना जाणीव करून देण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींनाही शिक्षा केली जाते. लग्नाचे योग्य वय पूर्ण झाल्याशिवाय आपल्या गावात, कुटुंबात किंवा परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती आपल्याला मिळाली तर 1098 या टोलफ्री क्रमांकावर माहिती देण्यात यावे याविषय मार्गदर्शन करण्यात आले.
सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या मार्गद्शनाखाली घेण्यात आले. यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक टी. एस. सरकार, व शिक्षक ए. ए. बिश्र्वास, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.