सहविचार सभेत २ प्रकरणांस “ऑन द स्पॉट” मान्यता
गडचिरोली येथे विमाशी संघाची शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ सहविचार सभा
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत समस्या निवारण सभा १ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्या दालनात पार पडली. या समस्या निवारण सभेत २ सेवा सातत्यास नियमित मान्यतेचे पत्र “ऑन द स्पॉट” देण्यात आले.
‘समस्या तुमच्या पुढाकार आमचा’ या ‘वि.मा.शि. संघा’च्या उपक्रमांतर्गत सभेत माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील सामूहिक व वैयक्तिक विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेत दोन सेवा सातत्याचे प्रकरणे कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची बाब आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षात आली. यावर आमदार अडबाले यांनी आजच्या आज मान्यता देण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिले. सभा संपताच कु. कविता रमेश तलमले (डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरी) व श्री. निकाल मधु बनकर (डॉ. आंबेडकर विद्यालय आरमोरी) यांच्या सेवा सात्यत्यास नियमित मान्यतेचे पत्र ऑन द स्पॉट देण्यात आले.
थकीत देयके माेठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याने आमदार अडबाले यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. भविष्य निर्वाह निधीच्या २०२३-२४ च्या पावत्या ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत तर २०२४-२५ च्या ऑफलाईन पावत्या ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत देण्याचे निर्देश आमदार अडबाले यांना अधिकाऱ्यांना दिले. भविष्य निर्वाह निधी अग्रीम परतावा व नापरतावा देयकांबाबत शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पत्र देऊन चौकशी समिती नियुक्त करा. वेतनेत्तर अनुदान येऊनही पाच महिन्यांचा कालावधी झाला तरीही वेतनेत्तर अनुदान शाळांना मिळालेले नाही. त्यामुळे वेतनेत्तर अनुदान १५ दिवसांत वितरीत करण्याबाबत सूचना दिल्या. सोबतच वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय देयके, प्रलंबित मान्यता प्रकरणे, वेतन तरतुद, थकीत वेतन देयके व इतर प्रलंबित प्रकरणे दिलेल्या वेळेत निकाली काढण्याच्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी (माध्य.) यांना दिल्या.
यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी श्री. गेडाम, वेतन पथक अधीक्षक श्री. नाकाडे, श्री. बारेकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, कार्याध्यक्ष नरेंद्र भोयर, जयंतराव येलमुले, शेमदेव चाफले, किशोर पाचभाई, अजय वर्धलवार, मनोज निंबार्ते, संजय घोटेकर, सूरज हेमके, संजय कुनघाडकर, पोपेश्र्वर लडके, संतोष कवासे, पुरुषोत्तम उरकुडे, माणिक पिलारे, रवीशंकर शहारे, ईतेंद्र चांदेकर, यशवंत रायपूरे, भगवान घोटेकर, सुखदेवे सर, बोडे सर, ताराचंद कोटंगले, नरेश मंगर, प्रा. संदीप अर्जुनकर, ओमप्रकाश संग्रामे, विवेक हुलके, संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










