लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत प्रशिक्षण योजना सुरु

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत प्रशिक्षण योजना सुरु

             भंडारा, दि.६ : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ  भंडारामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबांधी सामाजीक आर्थिक उन्नती व्हावी यांना रोजगार व स्वयंमरोजगाराची साधने उपलब्ध कावीत. म्हणून समाजातील गरजूंना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना उपजीवीकेचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांना ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण पाहिजेत त्या व्यवसायाचे प्रशिक्षणा करीता मुख्यालयाकडुन सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता भंडारा जिल्हयासाठी ४०० प्रशिक्षणार्थिचे प्रशिक्षण योजनेचे उदिष्टे प्राप्त झाले आहे. त्याकरिता इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज जिल्हा व्यवस्थापक साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा परिषद चौक भंडारा येथे सादर करावा असे आव्हान जिल्हा  व्यवस्थापक यांनी केले आहे:

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे

           १) अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी त्याच्या कडून घेतलेला असावा) २) अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न मर्यादा तीन लाखापर्यंत तहसीलदार यांच्या कडुन घेतलेला असावा) ३) नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटोच्या दोन प्रती जोडाव्या ४) रासन कार्डाची झेरॉक्स प्रती ५) आधारकार्ड झेरॉक्स प्रती/ मतदान कार्ड / मोबाईल कमांक (आधार कार्ड लिंक) ६) अर्जदाराचा शैक्षणिक दाखला ७) प्रशिक्षणार्थि मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील असावा ८) प्रशिक्षणार्थि महाराष्ट्रातील रहिवासी असावा ९) प्रशिक्षणार्थिचे

           वय १८ ते ५० वर्षे असावे १०) प्रशिक्षणार्थिने यापूर्वी शासनाच्या / महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाम घेतलेला नसावा ११) एका कुटुबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल १२) प्रशिक्षणार्थिणे आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा,असे जिल्हा व्यवस्थापक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) भंडारा यांनी कळवले आहे.