स्व. कार्तिकभाऊ आगडे मित्र परिवारातर्फे गणेशोत्सव निमित्त पाणी वाटप व महाप्रसादाचे आयोजन
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा उत्सव मानला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाने गावोगाव आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण होते. या पावन उत्सवाचे औचित्य साधून स्व. कार्तिकभाऊ आगडे मित्र परिवारातर्फे यंदाही विविध सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कार्तिकभाऊ आगडे यांनी समाजहिताची अनेक कार्ये केली. त्यांच्या अकाली निधनाने परिसराला मोठी पोकळी निर्माण झाली असली, तरी त्यांची कार्यनिष्ठा आणि सेवाभाव आजही मित्र परिवार पुढे नेत आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गणेशोत्सव काळात सर्व गणेश भक्तांसाठी १० दिवस पाणी वाटप करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सततच्या गर्दीमध्ये, भाविकांच्या सोयीसाठी केलेली ही व्यवस्था अत्यंत उपयुक्त ठरत असून, भक्तगणांकडून या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक होत आहे.
याशिवाय दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाच्या निमित्ताने सर्व गणेशभक्तांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. भक्तीभावाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम सामाजिक एकोपा व धार्मिक वातावरण अधिक मंगलमय करणारा ठरणार आहे.
स्व. कार्तिकभाऊ आगडे यांचे व्यक्तिमत्त्व हे सर्वांच्या मनात कायम स्मरणात राहील. त्यांनी उभारलेला सेवाभावाचा वारसा मित्रपरिवार सुद्धा तितक्याच श्रद्धा आणि उत्साहाने पुढे नेत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
या कार्यक्रमासाठी आयोजक विक्रांत पाटील, संयोजक: गौरव पिंपळशेंडे, कुणाल आगडे, सोनू आगडे, अंकित मानकर,सुरेश जुवारे,प्रवेश बुटले , प्रणय बेले,प्रवीण कोहळे,सोनू पाटील आदित्य वेल्हे, डॉ विशाल चव्हाण,रोहन धोंगडे,सचिन निवलकर, यांनी आवाहन केले आहे.