श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद निमित्ताने पोलीस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत राजुरा उपविभागातील शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न

श्री गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद निमित्ताने पोलीस स्टेशन बल्लारपूर अंतर्गत राजुरा उपविभागातील शांतता समिती सदस्यांची बैठक संपन्न

आगामी श्री गणेश उत्सव तसेच ईद ए मिलाद निमित्ताने जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन जातीय सलोखा कायद रहावा व सर्व प्रकारचे सण उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडावा या साठी पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शना खाली जिल्हयात प्रत्येक उपविभागा स्तरावरील पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, ईतर संबंधीत विभागाचे अधिकारी तसेच संबंधीत उपविभागातील विविध धर्मीय प्रतिष्ठीत नागरीक व शांतता समिती सदस्य आणि मा. लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येत आहे.

पोस्टे बल्लारपूर अंतर्गत आज दिनांक २५/०८/२०२५ रोजी आगामी गणेश उत्सव, ईद ए मिलाद सणा निमित्य पोलीस उपविभाग राजुरा स्तरीय शांतता कमेटी, पोलीस पाटील, गणेश मंडळ, डीजे धारक, व मुस्लिम बांधव यांची समन्वय बैठक श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे अध्यक्षते खाली एकदंत हॉल बल्लारपूर येथे १३/०० ते १४/३० वा दरम्यान घेण्यात आली. सदर बैठकीस श्री. सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा. तसेच श्री गोंड, तहसीलदार राजुरा, श्री साळवे, नायब तहसीलदार बल्लारपूर, श्री विशाल वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद बल्लारपूर, श्री धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद राजुरा, श्री अरविंद कातकर, म. रा. वि. वि. कंपनी बल्लारपूर, पोलीस निरीक्षक श्री. विपीन इंगळे, बल्लारपूर, श्री. सुमित परतेकी, पोनी. राजुरा, श्री. योगेश खरसान, सपोनी कोठारी, श्री. संतोष वाकडे, सपोनी विरूर, श्री. धर्मेंद्र मडावी, सपोनी धाबा व राजुरा विभागातील ईतर ठाणेदार तसेच राजुरा उपविभागातील शांतता कमेटी सदस्य, गणेश मंडळ, डीजे धारक, पोलीस पाटील, पत्रकार असे एकूण ९०-१०० लोकं हजर होते. आगामी गणेश उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखणे बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी आप आपले मत मांडले. उपस्थित संबंधित अधिकारी यांनी त्यांचे समस्या चे निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

विशेषतः सदर चे उत्सव शांततेत पार पाडण्याकरीता मंडप उभारणी, श्री गणेश मुर्तीची सुरक्षा, मंडपात व मिरवणुकीच्या वेळी करण्यात येणारी सजावट, देखावे हे आक्षेपार्य नसावेत. धार्मीक भावना दुखावणाऱ्या चित्रफित संबंधी स्पष्ट सुचना देण्यात आले. सर्व जाती धर्मामध्ये सामाजीक सलोखा व स‌द्भावनेचे वातावरण राहील याची दक्षता घेणे व त्यासाठी विविध उपाययोजना करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. उत्सव दरम्यान सोशल मिडिया वरून आक्षेपाहृ संदेश, मजकुर प्रसारीत होणार नाही याची काळजी घेणेबाबत सर्वांना सुचित करण्यात आले. बॅनर, होडींग योग्य प्रकारे लावण्याबाबत सुचीत करण्यात आले.

याकरीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वप्रकारचे खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना सह बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असुन सदर उत्सव कालावधीमध्ये कोणताही जातीय/धार्मीक तणाव निर्माण करणारी किंवा धार्मीक भावना दुखावणारी घटना / प्रकार घडुन जिलहयातील कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही याची सर्वांनी काळजी घेण्याबात मार्गदर्शन करण्यात आले.