एक आरोपी अटक, एम. डी. ड्रग्स, मोबाईल व वाहन असा एकुण १,०३,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त

(M.D.) मेफेड्रोन ड्रग अंमली विक्री करीता घेवुन जावुन पूर्ण गुन्हा नोंद

एक आरोपी अटक, एम. डी. ड्रग्स, मोबाईल व वाहन असा एकुण १,०३,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी

दिनांक १८/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत Mephedrone Drug हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे गोपनिय माहितीचे आधारावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने सरकार नगर चंद्रपुर येथे सापळा रचुन मोटार सायकल क्रमांक MH34-BN-0752 ला थांबवुन पंचासमक्ष चालकांची झडती घेतली असता चालक नामे सौरभ दुर्वास कसारे, वय २४ वर्ष रा. मेजर गेट, वैद्यनगर चंद्रपूर याचे ताब्यात एकुण 6.06 Grams Mephedrone Drug हा अमली पदार्थ अवैधरित्या विक्री करीता वाहतुक करीत असल्याचे मिळुन आल्याने सदर एम.डी. मेफेड्रान पावडर, एक मोटार सायकल व मोबाईल असा एकुण १,०३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुध्द पोस्टे रामनगर येथे एन.डी. पी.एस. अॅक्ट अपराध क्रमांक ६७५/२०२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, दिपक डोंगरे, प्रमोद कोटनाके, पोअं. अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.