पोलीस स्टेशन कोरपना हद्दीतुन चोरीस गेलेली पिकअप हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ ते १५ ऑगस्ट, २०२५ दरम्यान पोलीस स्टेशन कोरपना हद्दीत राहणारे फिर्यादी श्री सुधाकर आवारी यांची Tata ACE चार चाकी पिकअप वाहन क्र.MH04-GF-2690 ही चोरीस गेल्याने पोलीस स्टेशन कोरपना येथे अज्ञात आरोपीविरुध्द अपराध क्रमांक १६२/२०२५ कम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हयाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे एक पथक सदर गुन्हयाचे तपास कामी पो.स्टे. कोरपना परिसरात जावुन चौकशी करीत असतांना त्यांना कोरपना, नारंडा-गडचांदुर, पाटण या ३५ ते ४० कि.मी. रोडवरील सी.सी.टी.व्ही फुटेज ची पाहणी करुन सदर वाहन पाटण-जनकापूर रोडवर बेवारस मिळुन आल्याने जप्ती पंचनामा कारवाई करुन सदर चोरीचा वाहन जप्त करुन पोलीस स्टेशन कोरपना येथे जमा करण्यात आले असुन गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पोअ. गोपीनाथ नरोटे, शरद माथनकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.