ताश पत्याचा जुगार खेळतांनाऱ्यां ११ आरोपींना अटक // एकुण 2,20,770/- रु. चा मुद्देमाल
पाथरी पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही
दिनांक 16/08/2025 रोजी पोलीस स्टेशन पाथरीचे ठाणेदार सपोनि. डोर्लीकर सा. हे आपले पोलीस पथकासह पोलिस स्टेशन पाथरी परिसरातील मौजा निमगाव परिसरात पेट्रोलिंग करित असता मुखबिरदवारे खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा निमगाव येथे काही इसम 52 ताश पत्तावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगाराचा खेळ खेळीत आहेत अश्या मुखबिरचे खात्रीशिर माहीती वरून पोलीस स्टेशन पाथरी चे ठाणेदार सपोनी डोर्लीकर सा हे आपले पथकासंह सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता ईसम नामे क्र. हे 52 ताश पत्यावर पैशाची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळतांना मिळून आले. सदरच्या ठिकाणी जुगाराच्या डावावरिल तसेच आरोपीतांच्या अंगझडतीतून नगदी रु. 75,770/- रु. व 04 दुचाकी कि. 1,45,000/- रु. असा एकुण 2,20,770/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने घटनास्थळ जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीतांविरुद्ध कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंद कायदा अन्वये गुन्हा नोंद करून तपासावर घेतला. सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा., मा. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पाथरी चे ठाणेदार नितेश डोर्लीकर, पोहवा./2581 खेलेश कोरे, पोअ./1440 गिरिधर आंबोरकर, पोअ./313 मेघश्याम गायकवाड, पोअ./1320 अमित म्हस्के, पोअं./975 किरण भगत, पोअं./1771 श्रीराम बोदलकर, पोअ./980 विकेश वनस्कर यांनी केलेली आहे.