पोलीस स्टेशन-तळोधी बा. येथील घरफोडीच्या अपराधामधील आरोपी कडुन हस्तगत केलेला सोने-चांदीचे दागीने मुद्देमाल हस्तांतरण
पोलीस स्टेशन-तळोधी बा. येथे दाखल असलेल्या एकुण ०५ घरफोडीच्या अपराधामधील आरोपी कडुन हस्तगत केलेला किंमती मुद्देमाल सोने-चांदीचे दागीने (सोने १०८.६७० ग्रॅम व चांदी १०२.६०६ ग्रॅम) असा एकुण किमंत ८,००,०००/- रु. (अक्षरी आठ लक्ष) चा किंमती मुद्देमाल मा. श्री.मुम्मका सुदर्शन सा., पोलीस अधिक्षक चंद्रपुर, मा. ईश्वर कातकडे सा. अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, सा. याचे मार्गदर्शनाखाली दिनांक १३/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशन तळोधी बा. येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राकेश जाधव सा. उपविभाग, ब्रम्हपूरी यांचे हस्ते मा. न्यायदंडाधीकारी, प्रथम वर्ग, न्यायालय, नागभीड यांचे आदेशान्वये जप्तीपत्रकानुसार गुन्हयातील फिर्यादी नामे ०१) श्री. दानोदास वातुजी भाकरे रा. आकापूर, ०२) श्री. सोनुदास वातुजी भाकरे रा. आकापूर, ०३) श्रीमती सुधाबाई भीमराव मेश्राम रा. ओवाळा, ०४) श्री. कुणाल हरीचंद्र गहाणे रा. आकापूर, ०५) श्री. महादेव देवाजी इंदूरकर रा. धामणगाव चक, ०६) श्री. जीवन किसन बोरकर रा., जीवनापूर, सर्व ता.नागभिड जि. चंद्रपुर यांना हस्तांतरीत करण्यात आला.
सदर वेळी पोलीस स्टेशन तळोधी बा. चे ठाणेदार श्री. राहुल गुहे सा. तसेच गुन्हयाचे तपासी अधिकारी पोउपनि श्री. किशोर मानकर, पोउपनि श्री. चंद्रकात लांबट , पोलीस हवालदार रत्नाकर देहारे तसेच मुद्देमाल मोहरर पोहवा. विजय वाकडे व ईतर पोलीस अंमलदार हे हजर होते.