निरंकारी महिला संत समागम उत्साहात संपन्न..

निरंकारी महिला संत समागम उत्साहात संपन्न..

ब्रम्हाज्ञानाने आनंदी सहज जीवन – सीया अधाने

स्थानिय संस्कृती सांस्कृतीक भवन, आरमोरी रोड, गडचिरोली येथे झोन स्तरीय निरंकारी महिला संत समागम उत्साहात संपन्न झाला. यात परिसरातील हजारों महीलांनी भक्तीमय वातावरणात भाग घेतला. यात प्रमुख मार्गदर्शन श्रीमती सीया अधाने, संभाजी नगर यांनी सद्‌गुरू चे कृपेने प्राप्त ब्रम्हज्ञानाने कसे जीवन सहज व आनंदी होते यावर विस्तृत मार्गदर्शन केले.

संत समागमा मध्ये गडचिरोली व गोंदीया, चंद्रपूर, वडसा, आरमोरी, ब्रम्हपुरी, मूल, चामोर्शी, आष्टी, धानोरा, एटापल्ली, कुरखेडा, मालेवाडा, कोसंबी, नांदगाव, खाडीपार, नलेश्वर इ. परिसरातून आलेल्या महीला भाविकांनी भजन व प्रवचना द्वारे आपला सहभाग घेतला.

समागमासाठी निरंकारी सेवादल महीला पुरुष यांनी उत्तम व्यवस्था केलेली होती. समागम स्थळी कॅटीन, प्रकाशन इ. व्यवस्था लावण्यांत आलेली होती. सर्वासाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यांत आलेली होती.

समाजाला आमदार डॉ. देवराव होळी, मूळ सदस्य, डॉ. नामदेवंदी, श्री प्रशांत वाघरे, मुख्य नगराध्यक्ष सौ. योगिता पिपरे, सौ. गिता हिंगे, सौ. अनिता मडावी, श्री गोविंद सारडा, श्री सदानंद कुथे, श्री रमेश भरसे, श्री अनिल कुंरडकर, श्रीकर मधु भांडेकर इ. मान्यवरांनी आपली दर्ज केली.

संत समागमामध्ये हजारोंचा संख्येने महिलांनी भाग घेतला व कायक्रमातील सर्व प्रस्तुती महिलांनी केली.

समागमाला यशस्वी करण्यांसाठी संत निरंकारी मंडळाचे स्थानीय शाखेचा सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. संत समागमात सहभाग घेवून यशस्वी केल्या बद्दल झोनल इंचार्ज श्री किशन नागदवे व गडचिरोली शाखेचे मुखी श्री गजानन तुनकलवार यांनी सर्वाचे आभार मानले आहे.