आईने रागावल्यामुळे घरी कोणालाही काही न सांगता घरुन निघुन गेलेल्या अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध पोलीस स्टेशन रामनगर ची कामगिरी

आईने रागावल्यामुळे घरी कोणालाही काही न सांगता घरुन निघुन गेलेल्या अल्पवयीन बेपत्ता मुलीचा शोध पोलीस स्टेशन रामनगर ची कामगिरी

दिनांक २३/०८/२०१९ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रारदार यांनी तक्रार दिली होती की, त्यांची १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला आईने रागावल्याचे कारणावरुन मुलगी घरी कोणालाही काही न सांगता घरुन निघुन गेली होती तेंव्हा तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांनी मुलीचा खुप शोध घेतला परंतु मिळुन न आल्याने पोस्टे ला रिपोर्ट दिल्याने कलम ३६३ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपासात मुलीचा शोध कार्य सातत्याने करीत रामनगर पोलीसांना दिनांक ६/८/२०२५ रोजी म्हणजेच तब्बल ६ वर्षानी मिळुन आल्याने तिला विचारपूस केली असता ती फिरण्याकरीता पुणे येथे गेली होती व नंतर लॉकडाऊन लागल्याने ती पुण्यालाच राहीली असल्याचे सांगितले. सदर मुलगी वय २२ वर्ष हिला तिचे आई-वडीलांचे ताब्यात सुखरुप दिले असता आई-वडीलांनी पोलीस विभागाचे आभार मानले.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री आसिफराजा शेख यांचे नेत्त्वात सपोनि प्रज्ञा वाडेकर, पोहवा पवन डाखरे, मपोअं सिमा पोरेते, पोअं. सुमेध मानकर, चामपोअं प्राजक्ता रांजणकर सर्व पोस्टे रामनगर यांनी केली आहे.