सिंदेवाही बास्केटबॉल अकॅडमी शिरपेचात मानाचा तुरा // सात मुली व तीन मुलांची चंद्रपूर संघात निवड

सिंदेवाही बास्केटबॉल अकॅडमी शिरपेचात मानाचा तुरा

सात मुली व तीन मुलांची चंद्रपूर संघात निवड

सिंदेवाही बास्केटबॉल ॲकॅडमी चंद्रपूर जिल्ह्यात नावारूपास येऊन आपले वर्चस्व विदर्भात गाजवत आहे. या अकॅडमीतील खेळाडूंनी अंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत, खेलो इंडिया स्पर्धेत तसेच इतरत्र राज्यस्तरीय आयोजित बास्केटबॉल स्पर्धेमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याचे सादरीकरण नाव लौकिक केले आहे. अकॅडमीतील श्वेता जीवने, अंजली खोब्रागडे, मैथिली जनबंधू, रिमझिम साखरे, सानिया वाकडे, चाहत साखरे, धूमेश्वरी डोंगरे ,गजानन बागडे, श्रमय वालदे, माहीर पठाण खेळाडूंची एकदा निवड झालेली आहे.

75 वी ज्युनिअर आंतरजिल्हा राज्य स्तरीय मुले आणि मुली अजिंक्यपद स्पर्धा 18 वर्ष खेळाडू ऑगस्ट मध्ये बालेवाडी पुणे येथे स्पर्धेकरिता आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा बास्केटबॉल निवडलेला संघ सदर स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी रवाना होणार आहे. अकॅडमीचे प्रशिक्षक निनाद शेंद्रे प्रा. डॉ. अश्विन चंदेल चंद्रपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना, प्रा. डॉ. लेमदेव नागलवाडे ,विनय खोब्रागडे ,संतोष खोब्रागडे धनंजय मोगरे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.