Mephedrone Drug अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरुध्द गुन्हा नोंद दोन आरोपी अटक, एम.डी. ड्रग्स, मोबाईल व वाहन असा एकुण १,९२,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक २७/०७/२०२५ रोजी चंद्रपूर शहरातील पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत Mephedrone Drug हा अमली पदार्थ विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याचे गोपनिय माहितीचे आधारावरुन स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथकाने निमवाटीका रयतवारी कॉलरी परिसरात सापळा रचुन ड्रग्स विक्री करण्याकरीता वाहतुक करणारा आरोपी क्रमांक (१) विशाल रत्नाकर भोयर वय २१ वर्ष रा. बगडखिडकी चंद्रपूर व आरोपी (२) मो. फैज अब्दुल राशीद कुरेशी वय २२ वर्ष रा.नुरी चौक, बगड खिडकी चंद्रपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण २०.०० ग्रॅम Mephedrone Drug हा अमली पदार्थ आणि मोपेड वाहनासह इतर मुद्देमाल असा एकुण १,९२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुध्द पोस्टे रामनगर येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, श्री सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठठावार, दिपक डोंगरे, इमरान खान, पोअं किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, अजित शेन्डे, चापोअं रिक्षभ बारसिंगे, मिलींद टेकाम सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे.