अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या इसमास अटक
पोलीस स्टेशन राजुरा ची कारवाई
दिनांक २६/०७/२०२५ रोजी राजुरा पोलीसांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, रेल्वे वसाहत समोरील परिसर, सोनीया नगर राजुरा येथे एक इसम इसम अवैधरित्या तलवार बाळगुन असल्याचे माहितीवरुन सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता आरोपी नामे अकिब नासिर खान वय १९ वर्ष रा. चुनाभटटी वार्ड राजुरा यास ताब्यात घेवुन त्याचे जवळुन एक चमकदार ८१ सेमी लांबीची लोखंडी तलवार जप्त करुन त्याचेविरुध्द पोलीस स्टेशन राजुरा अपराध क्रमांक ३४६/२०२५ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास राजुरा पोलीस करीता आहे.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री सुधाकर यादव, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली राजुरा ठाणेदार पोनि श्री सुमित परतेकी यांचे नेतृत्वात पोउपनि भिष्मराज सोरते, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, रामेश्वर चहारे, पोशि शफीक शेख, महेश बोलगोडवार, शरद राठोड, आनंद मोरे, बालाजी यामलवार, अविनाश बांबोळे, राजीव दुबे सर्व पोलीस स्टेशन राजुरा यचांनी केली आहे.