राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षपदी यशवंत भोयर

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्षपदी यशवंत भोयर

भंडारा : जिल्हयातील शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल च्या नियुक्ती व नियुक्ती पत्र वाटपाचे छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन भंडारा विश्राम गृह येथे दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ ला करण्यात आले होते.
यात ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे यांच्या वतीने नियुक्ती पत्र वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले होते. यात जिल्हा उपाध्यक्षपदी यशवंत भोयर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, भंडारा पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे तसेच ओबिसी सेल अध्यक्ष यांनी ओबीसी सेलची सभा आयोजित केली होती. सभेत तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष निवड करून  नियुक्तीपत्र देण्यात आले. सभेला आवर्जून अजयभाऊ मेश्राम भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष, निशांत सुखदेवे जिल्हा उपाध्यक्ष, प्रफुल्ल गायधने जिल्हा युवा उपाध्यक्ष, ईश्वर कळंबे भंडारा तालुका अध्यक्ष, कुणाल पवार युवा नेते अड्याळ,राकेश हटवार पवनी, महेश गिर्‍हेपुंजे पवनी, भोयर  व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी पदाधिकारी यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सदर नियुत्तीबद्दल भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.