मॅक्स हॉस्पिटल, नागपूर तर्फे शिफा क्लिनिक, चंद्रपूर येथे स्पाईन आणि कॅन्सर उपचारासाठी खास ओपीडी सेवा सुरू

मॅक्स हॉस्पिटल, नागपूर तर्फे शिफा क्लिनिक, चंद्रपूर येथे स्पाईन आणि कॅन्सर उपचारासाठी खास ओपीडी सेवा सुरू

चंद्रपूर: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर यांनी आज डॉ. रझिक शेख यांच्या शिफा क्लिनिकच्या सहकार्याने स्पाईन सर्जरी आणि कॅन्सर उपचारासाठी खास ओपीडी सेवा सुरू केल्याची घोषणा केली. या ओपीडी सेवांचा शुभारंभ मॅक्स हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉ. परेश बंग आणि ऑन्को सर्जन डॉ. कवाडू जवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हे दोन्ही तज्ज्ञ डॉक्टर दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 या वेळेत उपलब्ध राहतील.

या ओपीडी सेवांच्या माध्यमातून मॅक्स हॉस्पिटलचा उद्देश म्हणजे चंद्रपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्यांच्या घराजवळच उच्च दर्जाच्या, अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, जेणेकरून रुग्णांना वेळेत आणि प्रभावी उपचार मिळू शकतील.

डॉ. परेश बंग, कन्सल्टंट – स्पाईन सर्जन, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर यांनी सांगितले, “अनेक वेळा पाठीच्या मणक्याशी संबंधित समस्या दुर्लक्षित केल्या जातात, जोपर्यंत त्या आयुष्यावर गंभीर परिणाम करत नाहीत. या ओपीडी सेवेच्या माध्यमातून आम्ही चंद्रपूरमध्ये आमच्या स्पाईन सर्जरी सेवांचा विस्तार करीत आहोत, जेणेकरून या भागातील लोकांना तज्ज्ञ उपचार जवळच मिळू शकतील. आम्ही कमी चीरफाड होणाऱ्या (मिनिमली इनवेसिव्ह) शस्त्रक्रिया पद्धती वापरतो, ज्यामुळे रुग्णांना कमी त्रास होतो आणि ते लवकर बरे होतात.”

डॉ. कवाडू जवाडे, कन्सल्टंट – ऑन्को सर्जन, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर यांनी सांगितले, “कॅन्सरच्या उपचारासाठी वेळेवर सल्ला घेणे आणि विविध तज्ज्ञांचा एकत्रित दृष्टिकोन असणे खूप महत्त्वाचे असते, जेणेकरून रुग्णाला सर्वोत्तम परिणाम मिळू शकतील. या नवीन कॅन्सर ओपीडीच्या माध्यमातून आम्ही अधिक रुग्णांना वेळेत निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य उपचार योजना आणि वैयक्तिक फॉलो-अप सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे रुग्णांना लांब प्रवास न करता स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळू शकतात. ही सेवा रुग्णांच्या घराजवळच संपूर्ण कॅन्सर उपचार सुविधा उपलब्ध करून देते, जेणेकरून रुग्णाला योग्य सल्ला योग्य वेळी मिळू शकेल. अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आमच्या शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात, आणि त्यामुळे रुग्णांचे परिणामही अधिक चांगले होतात. या आधुनिक पद्धती रुग्णाच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा त्रास कमी होतो, रुग्ण लवकर बरे होतो आणि एकूणच उपचाराचे परिणाम अधिक चांगले होतात.”

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर हे चंद्रपूर आणि आसपासच्या भागांतील लोकांना सहज उपलब्ध आरोग्य सेवा देण्यासाठी आणि आपल्या सेवा अधिक विस्तारण्यासाठी कटिबद्ध आहे.

मॅक्स हेल्थकेअर बद्दल:

मॅक्स हेल्थकेअर इन्स्टिटयूट लिमिटेड (मॅक्स हेल्थकेअर) ही भारतातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा संस्थांपैकी एक आहे. ही संस्था उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाच्या सहाय्याने उच्च दर्जाची रुग्णसेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.

मॅक्स हेल्थकेअर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, 22 आरोग्य सेवा केंद्रे (5000 बेड्सचेचालवते. यामध्ये कंपनी आणि तिच्या उपकंपन्या, भागीदारीत असलेली आरोग्य केंद्रे आणि व्यवस्थापित आरोग्य सेवा केंद्रे यांचा समावेश आहे. या नेटवर्कमध्ये दिल्ली एनसीआर मधील साकेत (3 रुग्णालये), पटपडगंज, वैशाली, राजेंद्र प्लेस, द्वारका, नोएडा आणि शालीमार बाग येथे अत्याधुनिक श्रेणीची रुग्णालये आहेत. तसेच लखनऊ, मुंबई, नागपूर, मोहाली, बठिंडा, देहराडून येथे प्रत्येकी एक रुग्णालय आहे. याशिवाय गुरगाव आणि बुलंदशहर येथे दुय्यम आरोग्य केंद्रे तसेच नोएडा, लाजपत नगर (2 केंद्रे), पंचशील पार्क (दिल्ली एनसीआर) आणि मोहाली (पंजाब) येथे वैद्यकीय केंद्रे कार्यरत आहेत. मोहाली आणि बठिंडा येथील रुग्णालये पंजाब सरकारसोबत पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप योजनेअंतर्गत चालवली जातात.

याशिवाय, मॅक्स हेल्थकेअर “मॅक्स@होम” आणि “मॅक्स लॅब्स” या ब्रँड नावांखाली होमकेअर आणि पॅथॉलॉजी सेवा देखील पुरवते. “मॅक्स@होम” घरीच आरोग्य आणि तंदुरुस्ती सेवा पुरवते, तर “मॅक्स लॅब” रुग्णालयाच्या बाहेर देखील निदान सेवा प्रदान करते.

चंद्रपुर में स्पाइन और कैंसर के इलाज के लिए खास ओपीडी सेवा

मैक्स हॉस्पिटल, नागपुर ने शु की चंद्रपुर के शिफा क्लिनिक में सुविधा

चंद्रपुर | मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नागपुर ने आज डॉ. रज़ीक शेख के शिफा क्लिनिक के सहयोग से स्पाइन सर्जरी और ऑन्कोलॉजी (कैंसर के इलाज) के लिए खास ओपीडी सेवाएं शुरू करने की घोषणा की। इन सेवाओं का शुभारंभ मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नागपुर के कंसल्टेंट स्पाइन सर्जन डॉ. परेश बंग और कंसल्टेंट ऑन्को सर्जन डॉ. कवाडू जवाडे की उपस्थिति में किया गया। ये दोनों विशेषज्ञ डॉक्टर हर महीने के तीसरे शनिवार को सुबह 11:00 बजे से दोपहर 2:00 बजे तक उपलब्ध रहेंगे।

इन ओपीडी सेवाओं की शुरुआत के साथ, हॉस्पिटल का उद्देश्य है कि चंद्रपुर और आसपास के मरीजों को उनके घर के नज़दीक ही उन्नत और उच्च गुणवत्ता वाली चिकित्सा सेवाएं दे सके, जिससे उन्हें समय पर और प्रभावी उपचार मिल सके।

डॉ. परेश बंग ने कहा,

“रीढ़ की हड्डी से जुड़ी समस्याओं को अक्सर तब तक नजरअंदाज किया जाता है जब तक वे जीवन पर बुरा असर नहीं डालतीं। इस ओपीडी सेवा के ज़रिए हम चंद्रपुर में अपनी स्पाइन सर्जरी सेवाओं का विस्तार कर रहे हैं, जिससे विशेषज्ञ उपचार अब यहां के लोगों को नज़दीक ही मिल सके। हम कम चीरफाड़ (मिनिमली इनवेसिव) वाली सर्जिकल तकनीकों का उपयोग करते हैं, जिससे मरीजों को कम तकलीफ होती है और वे जल्दी ठीक हो जाते हैं।”

डॉ. कवाडू जवाडे, बताया की “कैंसर के इलाज के लिए समय पर सलाह और कई विशेषज्ञों की टीम का मिलकर इलाज करना बहुत जरूरी होता है, ताकि मरीज को बेहतर परिणाम मिल सकें। इस नई ऑन्कोलॉजी ओपीडी के माध्यम से हम अधिक से अधिक मरीजों को लाभ पहुंचाने का लक्ष्य रखते हैं। इसके तहत हम समय पर बीमारी की पहचान, विशेषज्ञों द्वारा उपचार की योजना और व्यक्तिगत फॉलो-अप की सुविधा देंगे, जिससे मरीजों को दूर तक जाने की जरूरत नहीं पड़ेगी। इस पहल के जरिए अब कैंसर का संपूर्ण इलाज उनके घर के पास ही मिल सकेगा, और मरीजों को सही समय पर सही सलाह मिल सकेगी। हम उन्नत रोबोटिक तकनीक का इस्तेमाल करते हैं जिससे सर्जरी ज्यादा सटीक होती है और इसके बेहतर नतीजे मिलते हैं। ये आधुनिक तकनीकें मरीजों की सुविधा को ध्यान में रखकर बनाई गई हैं, जिससे ऑपरेशन के बाद कम तकलीफ होती है, जल्दी आराम मिलता है और इलाज का अनुभव बेहतर होता है।”

मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, नागपुर चंद्रपुर और आसपास के इलाकों में अपनी सेवाएं बढ़ाने और लोगों को सुलभ स्वास्थ्य सेवाएं उपलब्ध कराने के लिए प्रतिबद्ध है।