चिमुर येथील घरफोडीचा गुन्हा अवध्या ४८ तासाचे आंत उघड तर ७ दिवसात चोरीतील ३८ तोळे सोन्याचे दागीने फिर्यादीस सुर्पूद
पोलीसांचे कर्तव्य, नागरिकांची कृतज्ञता
दिनांक ११/०७/२०२५ रोजी रात्रौ फिर्यादी सौ. कल्पना मुर्लीधर गोन्नाडे वय ४६ वर्ष रा. प्रगती नगर चिमुर यांनी पोस्टे चिमुर ला येवुन तक्रार नोंदविली होती की, दि.०६/०७/२०२५ ते दि.११/०७/२०२५ दरम्यान त्या कुटूंबियांसह बाहेर गावी असतांना कोणीतरी अज्ञात चोरटयांनी त्याचे बंद घराचे दरवाज्याचा कुलूप तोडुन आंत प्रवेश करुन घरात ठेवलेल्या एकुण ३८ तोळे ६०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागीने चोरुन नेले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हयाचा सखोल व तंज्ञबध्द पध्दतीने सर्वकष तपास करुन दि.१३/०७/२०२५ रोजी अवघ्या ४८ तासाचे आंत गुन्हयातील आरोपी अटक करुन आरोपीतांकडुन चोरीस गेलेले संपुर्ण सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले होते.
सर्व सामान्य नागरीक आयुष्यात अत्यंत परिश्रमाने आपल्या कुटूंबियांकरीता मौल्यवान वस्तु विकत घेतो आणि अशा परिश्रमातील मौल्यवान वस्तु चोरीस गेल्यावर त्यांच्या संपूर्ण कुटूंबियांच्या मनाला जबरदस्त आघात पोहचतो. अशा परिस्थितीत सदरची मौल्यवान किंमती मालमत्ता गुन्हेगारांकडुन पोलीसांच्या उत्कृष्ठ तपास कार्यपध्दतीने हस्तगत झाल्यावर ती लवकरात लवकर संबंधीत फिर्यादी/नागरीकास परत मिळावी हे पोलीसांचे कर्तव्य असुन असे केल्यास त्याचा एक वेगळाच समाधान मनाला होईल या हेतुने पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन यांच्या संकल्पनेने अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे कुशल नेत्त्वात चिमूर पोलीसांनी विद्यमान न्यायालयीन प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन दिनांक १९ जुलै, २०२५ रोजी गुन्हा उघडकीस आल्याचे सात दिवसाचे आंत सदर गुन्हयातील हस्तगत मुद्देमाल-
1. सोन्याची चपलाकंठी तिन पदरी वजन 55.160 ग्रॉम किं. 5,35,052/- रु. (किं. आजचा बाजार भाव नुसार)
2. सोन्याची पोत कोळ मनि व पदक वजन 57.370 ग्रॉम किं. 5,56,489/- रु.
3. सोन्याच्या बांगडया वजन 40.140 ग्रॉम किं. 3,89,358/- रु.
4. सोन्याची गोप वजन 12 ग्रॉम किं. 1,16,400/- रु.
5. सोन्याच्या पाटल्या दोन नग वजन 73.460 ग्रॉम किं. 7,12,562/- रु.
6. सोन्याचे कानातील टॉप्स एकुण ६ नग वजन 24.420 ग्रॉम किं. 2,36,874/- रु.
7. सोन्याचे कानातील गोल रिंग दोन नग वजन 5.700 ग्रॉम किं. 55,290/- रु.
8. सोन्याचे चार नग आंगठया वजन 29.380 ग्रॉम किं. 2,84,986/- रु.
9. सोन्याचे कानातील टॉप्स दोन नग वजन 2.340 ग्रॉम किं. 22,698/- रु.
10. सोन्याची नथ वजन 1.040 ग्रॉम किं. 10,088/- रु.
11. सोन्याची गळसोरी काळे मनी असलेले वजन 22.830 ग्रॉम किं. 2,21,451/- रु.
12. सोन्याची पदक असलेली गलसोरी वजन 12.140 ग्रॉम किं. १,१७,७५८/- रु.
13. सोन्याची नथ चौन एक नग वजन 12 ग्रॉम किं. 25,000/- रु.
14. भारतीय चलनाचा 200 रु.च्या 30 नोटा एकुण 6,000/- रु.
15. भारतीय चलनाचा 200 रु.च्या 28 नोटा एकुण 5,600/- रु.
असा संपूर्ण मुद्देमाल दिनांक १९/०७/२०२५ रोजी पंचासमक्ष श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनकर ठोसरे यांच्या हस्ते चिमुर पोलीसांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चिमुर येथे शपथकर्ता फिर्यादी सौ. कल्पना मुर्लीधर गोन्नाडे वय ४६ वर्ष रा. प्रगती नगर चिमुर यांना सुपूर्द/परत करण्यात आला आहे.
संपुर्ण मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंदाने फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि पोलीसांचे चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचा समाधान झाल्याने परिसरातील नागरिकांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.